? Brihan Maharashtra Mandal
 
Events
  • अ)बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीचे अखिल भारतीय संगीत संमेलन बेंगलोर येथे महाराष्ट्र मंडळाच्या सौजन्याने संपन्न.
  • ब) बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रांतीय अधिवेशन - कर्नाटक प्रांत बेंगलोर येथे संपन्न.
  • क) वरील कार्यक्रमाचे वृत्त व फोटो सोबतच्या पीडीएफ फाईल मध्ये संलग्न .
  • ड) बृहन्महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणी बैठक भोपाळ येथे दि.19.03.2017 रोजी आयोजित.
 
 
संलग्न संस्थासाठी विशेष महत्वपूर्ण सूचना :
विषय: महाराष्ट्र शासनातर्फे बृहन्महाराष्ट्रातील संस्थांसाठी "बृहन्महाराष्ट्र मंडळे आर्थिक सहाय्यता योजना-2016"
आपल्याला सूचित करताना आनंद होतो की महाराष्ट्र शासनाने "राज्य मराठी विकास संस्था" च्या माध्यमाने बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्थाच्या मराठी भाषा, साहित्य व संस्कृती विकासासाठी या वर्षीपासून शासनाच्या निर्णय क्रमांक रासांधो-2016/प्र.क्र.89/2016/भाषा-3 दि.13 जून 2016 अन्वये राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमाने अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे. संपूर्ण परिपत्रक संलग्न आहे.

1. राज्य मराठी विकास संस्थेशी झालेल्या चर्चेनुसार वरील प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख 25 मार्च 2017 ठरविली गेली आहे.
2. प्रस्ताव पाठविताना कृपया ध्यानात ठेवावे की हे प्रस्ताव बांधकाम योजनेसाठी नसून बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्थाच्या मराठी भाषा, साहित्य व संस्कृती विकासासाठी आहे. प्रस्ताव पाठविताना कृपया परिपत्रक नीट वाचावे.
3. प्रस्तावात दिलेल्या नियमांचे पूर्ण पालन केले जावे व आवश्यक दस्तावेज जोडावेत.
4. सध्या शासनातर्फे यासाठी रु.20 लाख स्वीकृत केले गेले आहेत. त्यानुसार अधिकतम रु.2.00 लाख स्वीकृत केले जाऊ शकतात.
5.शासनाने या वर्षी पासूनच ही योजना बृहन्महाराष्ट्र मंडळातील संस्थांसाठी सुरु केली आहे. यावेळचा संस्थांचा उत्साह पाहून त्यात आणखी सुधार केला जाऊ शकतो.
6.पुढील वर्षी बृहन्महाराष्ट्र मंडळ व राज्य मराठी विकास संस्था मिळून ही योजना राबविणार आहे.
7.आपल्या संपर्कातील संस्थांनाही याची माहिती देण्याची कृपा करावी.

तरी आपल्या सर्व संलग्न संस्थांच्या पदाधिका-यांना निवेदन आहे की या योजनेचा लाभ घ्यावा व आपले प्रस्ताव दि.25.03.2017 पावेतो सरळ राज्य मराठी विकास संस्थेकडे पाठवावेत. बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे महाराष्ट्र शासनाशी सुरु असलेल्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे.  एक कॉपी मेल द्वारे महासचिवंकडे पाठवावी.

धन्यवाद.
डॉ. रवि गि-हे महासचिव

आपण येथे दस्तऐवज डाउनलोड करू शकता
Download

विलास बुचके - कार्याध्यक्ष
09303135972
buchkevilas@yahoo.com
  डॉ. रवि गि-हे प्रधान कार्यवाह
09850396080
ravi.girhe@yahoo.com
 
प्रशासकीय कार्यालय
बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली

१००५६ मुल्तानी ढांडा , पहाडगंज पोलिस 
स्टेशन समोर ,पहाडगंज, 
नवी दिल्ली – ११००५५

 
Powered by SynQues   Copyright © 2012 www.bmmindia.org   Disclaimer | Privacy Policy | Sitemap